स्व.माणिकचंदजी कासलीवाल यांचा २० वा भावांजली समारोह संपन्न
नांदगाव – नांदगाव येथील सौ.क.मा कासलीवाल माध्यमिक व प्राथमिक विद्यालय व जे.टी कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल येथे स्व माणिकचंदजी कासलीवाल यांचा २० वा भावांजली समारोह संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने पार पडला. भावांजली समारोहानिमित्त दरवर्षी समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.गेल्या दिड वर्षापासून कोरोना या भयानक रोगामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कित्येकांची अपरिमित हानी झाली आहे.कार्यक्रमाच्या सुरूवातीला कोरोना मुळे निधन झालेल्या ज्ञात अज्ञात दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांचे पितृ अथवा मातृ छत्र हरपले आहे किंवा दोन्ही छत्र हरपले आहे अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना सामाजिक बांधिलकीतून संस्थेच्या वतीने प्रत्येकी रूपये २१ हजारांचे धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली. तसेच दोन्ही माध्यमातील या विद्यार्थ्यांना दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याची घोषणा संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल यांनी याप्रसंगी केली.या घोषणेमुळे सदर कुटुबियांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
सन्मानित विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
प्रथम – डफाळ मानसी गोरख (94.20%)
द्वितीय- घोटेकर आदित्य भालचंद्र (94%)
तृतीय- मोकळ साक्षी मधुकर (91.20%)
प्रथम-तेजेस प्रशांत पाटिल 98.80
द्वितीय-स्नेहल प्रवीण सौंदाणे 98.60
तृतीय -हर्षद कैलास पवार 93.40 या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.
वडिलांच्या आशीर्वादानेच त्यांचा शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीचा वारसा समर्थपणे पुढे सुरू राहिल असे आश्वासन दिले. तसेच या शैक्षणिक वर्षापासून अकरावी व बारावी चे वर्ग आणि इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या वर्गांसाठी राज्य बोर्डासोबतच CBSC बोर्डचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची घोषणा केली.
विद्यालयातील शिक्षक संजय त्रिभुवन सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य कामगिरी करणारे व सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारे स्व.माणिकचंदजी कासलीवाल यांना शब्दसुमनांनी विनम्र अभिवादन केले. प्रत्येक प्रसंगात पाठीशी उभे राहून प्रोत्साहन देणारे असे स्व.माणिकचंदजी कासलीवाल यांचे व्यक्तिमत्व होते असे गौरवोद्गार काढले.
तसेच प्रशासकीय अधिकारी पी.पी.गुप्ता सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना हा कृतज्ञतांजली समारोह आहे असे वर्णन करून स्व.माणिकचंदजी कासलीवाल यांच्या गतकाळातील आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा,प्रमिला कासलीवाल,विश्वस्त महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, सुशीलकुमार कासलीवाल ,रिकबचंद कासलीवाल,आनंद कासलीवाल, प्रशासन अधिकारी पी.पी गुप्ता ,निर्मला कासलीवाल,सुनीता चोपडा,पुष्पा चांदीवाल, अंकुर कासलीवाल ,मयुरी कासलीवाल ,समीर कासलीवाल, प्रतिक कासलीवाल, अभिजित कासलीवाल,मुख्याध्यापक सर्वश्री गोरख डफाळ, विशाल सावंत, प्रिन्सिपल मनी चावला तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश दामले यांनी तर दत्तात्रय पवार यांनी आभार व्यक्त केले.