नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधान सभा मतदार संघाचे शिंदे गटाचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मतदार संघातील आदिवासी वस्तीवर बांधलेल्या सभामंडपासाठी भगवान एकलव्य यांच्या ८१ मुर्तीचे वाटप केले. यावेळी १६४ जोडप्यांसह या ८१ मुर्तीची पुरोहितांच्या हस्ते पुजा करण्यात आली. आदिवासी बांधव सन्मानार्थ तालूक्यातील उभारण्यात आलेल्या ८१ गावांमध्ये या मुर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. तत्पुर्वी हा भव्य मुर्ती पुजनांचा कार्यक्रम नांदगाव येथे संपन्न झाला.