अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सर्वत्र शिवसैनिक आक्रमक होवून आमदार यांचे निवासस्थान व कार्यालयाची तोडफोड करीत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव येथील निवासस्थानी व कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतर राज्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त लावण्यात आला आहे.. दरम्यान मनमाड येथील मालेगाव चौफुलीवरील त्यांच्या कार्यालयावर ऐका तरुणाने दगड फेकल्याची चर्चा असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.