नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याचा रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर चोरीला गेला. त्याचवेळी दुसरा ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. ट्रॅक्टर चोरीला गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शेतकरी जमा झाले. त्यानंतर त्यांनी बाजार समिती समोर नांदगाव-येवला मार्गावर येत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. ट्रॅक्टरचा शोध लागत नाही तोपर्यंत कांदा लिलाव पुकारू देणार नाही असा पवित्रा शेतक-यांनी घेतल्याने कांद्याचे लिलावही ठप्प झाले आहे