नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गिरणा धरणावरून ये – जा करण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी मच्छीमार व स्थानिक रहिवासी यांचे तहसील कार्यालयावर बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण भिंतीवरील रस्त्यावरून ये – जा करू द्यावी या मागणीसाठी परिसरातील मच्छीमार व स्थानिक रहिवाशांनी आज नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयात बिऱ्हाड आंदोलन केले. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी संबधित धरण प्रशासनाशी संवाद साधून स्थानिकांना रस्ता मोकळा करून देण्याबाबत चर्चा केली. लवकरच हा रस्ता सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, सोमवार पर्यंत ( दि.१० ) धरणावरून जाण्याचा रस्ता सुरू न केल्यास जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी यावेळी प्रशासनाला दिला..
चांदवडला वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
चांदवड तालुक्यातील मेसनखेडे शिवारात चांदवड-मनमाड रस्त्या लगत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. शिकारीच्या शोधात फिरत असतांना रात्रीच्या सुमारास अज्ञाच्या धडकेने आठ वर्षीय बिबट्या ठार झाला. वनविभागाने बिबट्याला चांदवड येथे नेत त्याचे शव विच्छेन करुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याअगोदरही अपघात वन्यप्राण्यांचे जीव गेले आहे.