नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रचंड उन्हाळा असल्याने दुचाकी व चार चाकी वाहाने अचानक पेट घेत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण नांदगाव बाजार समितीच्या आवारात मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास निदर्शनास आले. समितीच्या आवारात दुचाकीने अचानक पेट घेतला. पण प्रसंगावधान राखून तिथेच उभे असलेले प्रशांत इघे आणि किरण घुगे या दोन तरुणांनी धाडस करुन दुचाकी विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्याबद्दल या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरील दुचाकी सुनिल वाघ (रा. दहेगाव नाका) यांची असल्याचे सांगण्यात आले.
(व्हिडिओ – अनिल धामणे)