नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाशिकच्या नांदगाव येथील जरांगे समर्थकांनी काढलेल्या मोर्चात मराठा आंदोलकाने अर्धनग्न होत अंगावर आसूड घेत आत्मक्लेश आंदोलन केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या नांदगाव येथे सकल मराठा समाजातर्फे जनाअक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विशाल वडघुले या मराठा आंदोलकाने अर्धनग्न होत स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेत आत्मक्लेश केला. दरम्यान जवळच असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आसूड काढून घेतला.