इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमध्ये चोरीच्या घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारी देखील वाढल्याचे दिसून येते. विशेषत : उत्तर भारतातील रेल्वे मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पैसे आणि दागिने लंपास होण्याचे प्रकार वाढले आहेत.
वास्तविक पाहता रेल्वे मध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात असणे आवश्यक असते. परंतु अनेक ठिकाणी अशी सुविधा नसते. त्यामुळे चोरट्यांचे फावते. तसेच काही वेळा प्रवासदेखील निष्काळजीपणे वागतात. त्यामुळे त्यांच्या बॅगा चोरीला जातात, तसेच मौल्यवान सामान देखील सामानाची देखील चोरी होते. या संदर्भात रेल्वे विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.
श्रीगंगानगर येथून नांदेड एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये चढून भोपाळला जाणाऱ्या महिलेची बॅग आग्राजवळ चोरीला गेली. बॅगेत 55 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे व दागिने ठेवण्यात आली होती. सोन्याने भरलेली बॅग चोरीला गेल्याने रेल्वेत खळबळ उडाली. ग्वाल्हेरमध्ये ट्रेन थांबल्यानंतर महिलेने जीआरपीकडे गुन्हा दाखल केला आहे. जीआरपीने गुन्हा नोंदवला असून केस डायरी आग्रा येथे पाठवली आहे.
रेल्वे स्टेशन प्रभारी प्रमोद पाटील यांनी सांगितले की, भोपाळ येथील रहिवासी हिना गुप्ता या रात्रीच्या वेळी नांदेड एक्स्प्रेसमधून ए-१ कोचमधून आपल्या पतीसोबत प्रवास करत होत्या. रात्री त्यांनाला झोप लागली. आग्र्याजवळ त्यांना जाग आली तेव्हा बॅग गायब असल्याचे दिसले. बॅगेत सोन्याची बिस्किटे आणि 55 लाखांचे दागिने होते. ही घटना आग्राजवळ घडली असल्याने केस डायरी तपासासाठी पाठवण्यात आली आहे. आग्रा विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.