नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय सैन्यदलातील जवानांबद्दल सर्वांना नेहमीच अभिमान वाटत असतो, मात्र मराठवाड्यातील एका जवानाने या प्रतिमेला काळीमा फासला आहे.नांदेडमध्ये असलेल्या सैन्यदलातील या सैनिकाने गर्भवती पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कुटुंबियांची हत्या केल्यानंतर आरोपी जवान स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सैन्यदलातील जवान तथा सैनिकाने असे कृत्य का केले ? याची अद्याप कोणतीही माहिती कळालेली नाही. नांदेडचे पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आठ महिन्यांची गर्भवती
भारतीय सैन्य दलातील जवान सीमेवर देशाची रक्षण करत असतात. शत्रु देशाच्या सैन्य किंवा दहशतवाद्यांच्या विरोधात ते लढा देतात. वेळप्रसंगी ते वीरमरण पत्करतात पण देशासाठी हार मानत नाही. मात्र भारतीय सैन्यातील जवानांची प्रतिमेला धक्का लावणारा एक भयानक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बोरी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे.राजस्थानमधील बिकानेरमध्ये एकनाथ जायभाये नियुक्त आहे. सैनिक असलेल्या एकनाथने त्याची पत्नी भाग्यश्री (वय २३) आणि मुलगी सरस्वती (वय ४) यांची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी एकनाथ जायभाये स्वतः माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे एकनाथची पत्नी भाग्यश्री आठ महिन्यांची गर्भवती होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास एकनाथ जायभाये याने पत्नी भाग्यश्री आणि चार वर्षाची मुलगी सरस्वती या दोघेही झोपेत असताना त्यांची गळा आवळून त्यांची हत्या केली.
थेट पोलिसांसमोर हजर झाला
स्वतःआरोपीने माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती. दरम्यान हत्या करण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. वास्तविक हा प्रकार अतिशय संतापजनक व धक्कादायक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने आपल्या पत्नीची आणि अवघ्या चार वर्षाच्या लेकीची हत्या का केली असेल? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. संबंधित प्रकार हादरवणारा आहे. या घटनेनंतर माळाकोळी पोलीस ठाण्यात संतप्त ग्रामस्थांनी गर्दी केली होती. माळाकोळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी मयत विवाहितेच्या माहेरच्यांनी लोकांनी आरोपी जवान हा माहेरावरून प्लॉट घेण्यासाठी पैसे आणण्यासाठी तगादा लावत होता, असा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Nanded Crime Jawan Killed Pregnant Wife and Daughter Murder