नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथील सिमेंट बंधाऱ्या जवळ असलेल्या नदीकिनारी मेढयां चारताना लहान मुलगा वाल्मीक बापू इटनर (१५) हा मेढ्या धूत असतानां पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याची आई इंदूबाई बापू इटनर (३५) रा खिर्डी ही गेली असता तीही पाण्यात बुडत असतानां मुलाचा मामा अंबादास केरूबा खरात (२९) रा खिर्डी हा त्यांना वाचविण्यासाठी गेला असता या तिघांही मेढंपाळाचा पाण्यात बुडून मुत्यू झाला. एेन दिवाळीत नांदगाव शहर व परिसरात दोन दिवसात १० व्यक्तीचा दुर्देवी मुत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.