नांदगाव – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव या ठिकाणी नुकतेच विज्ञान मंडळाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे तसेच वक्ते म्हणून येवला येथील स्वामी मुक्तानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी. गोस्वामी हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. मराठे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. डब्ल्यू चवरे यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना, डॉ. गोस्वामी यांनी परीक्षार्थी नव्हे तर ज्ञानार्थी बना, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, नैतिक मूल्यांचे अंगी करण करा, कौटुंबिक तसेच सामाजिक वर्तन सलोख्याचे ठेवा असे मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसून जीवन जगण्याचे साधन आहे असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मराठे यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून विज्ञान विषयक बऱ्याच गोष्टींची माहिती देताना विज्ञानाचा मानव कल्याणासाठी तसेच विनाशासाठी उपयोग केला जाऊ शकतो असे सांगितले. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचा समाज कल्याणासाठी उपयोग करावा असे आवाहन केले.
डॉक्टर चवरे यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून विज्ञान मंडळाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम जसे प्रश्नमंजुषा स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा, विज्ञान दिन सेलिब्रेशन इत्यादी कार्यक्रमाची माहिती दिली. आय क्यू ए सी समन्वयक डॉ. व्ही बी सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भौतिक शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. ए.एल.तिदार यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन. प्रा.बी. पी. मोरे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक जसे प्रा. एम. बी. आटोळे , प्रा.ए. एन. मदने, डॉ मंगेश दुशिंग, प्रा.निकम, प्रा. राजनोर , प्रा. शिंदे, प्रा.चव्हाण , प्रा. शिंदे व विज्ञान शाखेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नितीन सरोदे यांनी तांत्रिक साहाय्य केले.