अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी गणेश धात्रक यांची निवड झाल्या नंतर नांदगाव तालुक्यात पुन्हा जुन्या पदाधिकारी यांना पद देण्यात आली आहे. त्यामुळे आज जिल्हाप्रमुखसह पदाधिकारींनी नांदगाव शहरातील रॅली काढत सर्व महापुरुषांच्या पुतळ्याना अभिवादन केले. नांदगाव तालुका हा शिवसेनेचा राहील आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नियुक्त्या केल्या जातील असे ही गणेश धात्रक यांनी स्पष्ट केले. यावेळी नांदगाव, मालेगाव मतदार संघात नियुक्त झालेले पदाधिकारी उपस्थितीत होते.