सुमितकुमार जगधने
नांदगांव – सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात शिक्षक, विद्यार्थी यांनी एकत्रीत स्वच्छता मोहीम राबून जमलेल्या पाला पाचोळ्याची होळी करुन सण साजरा केला. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी विद्यालयाचा परिसराची स्वच्छता करून आवारातील झाडांचा पालापाचोळा प्लास्टिक व कागद आदी जमा झालेल्या कचरा पाला पाचोळा यांचे दहण करून होळी सण साजरा केला. यात मुलांनी अनिष्ट रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा, राग, द्वेष, मत्सर, आळस, मी पणा, गर्व, अंधश्रद्धा, अहंकार, वाईट गुण यांचे तक्ते बनवून त्यांचे होळीत दहन केले. श्रीमती चोळके यांनी होळी या सणाविषयी माहिती दिली. त्यानंतर आपल्या मधील वाईट गोष्टी होळीच्या माध्यमातून समूळ नष्ट कराव्यात हा संदेश दिला. यावेळी मुख्याध्यापक व्ही.पी. सावंत माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरख डफाळ उपस्थित होते. प्रशासन अधिकारी पी.पी. गुप्ता, चेअरमन सुनील कुमार कासलीवाल, विजय चोपडा, महेंद्र चांदिवाल या सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, विजय जाधव,धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, जयश्री चोळके,अनिता पवार, वैशाली शिंदे आदींनी परिश्रम घेतले. अशाप्रकारे होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे नांदगांव अनिसचे अध्यक्ष. प्रा सुरेश नारायने यांनी स्वागत केले.