नाशिक – नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे प्रिन्स ट्रेडर्सवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) टाकलेल्या धाडीत ४४ लाख २६ हजार ५५ हजाराता प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला. याप्रकरणी एफडीएने गोकुळ बाबुलाल कोठारी याचे विरुद्ध नांदगाव पोलीस ठाणे अन्न सुरक्षा मानदे कायदाच्या विविध कलमन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, अविनाश दाभाडे (दक्षता) व गोपाल कासार यांनी गुप्त माहितीच्या आधारे केली. याबाबत त्यांनी सांगितले की, मे. प्रिन्स ट्रेडर्स, रोहीला रोड, बोलठाण, ता. नांदगाव, जि. नाशिक येथे धाड टाकली असता त्यांना सदर ठिकाणी दोन बंद गोडावून मध्ये तसेच परिसरात उभ्या असलेल्या पिकअप गाडी मध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. सदर मालाबाबत चोकशी केली असता तो साठा आरोपी नामे गोकुळ बाबुलाल कोठारी, राहणार – बोलठाण याच्या मालकीचा असल्याचे आढळून आले. सदर साठ्याची एकूण किंमत रु. ४४,२६,०५५ इतकी आहे. तसेच जप्त वाहनाची अंदाजे किंमत रु.२००००० इतकी आहे. सदर गोडावून तसेच वाहन यांना पुढील तपास कामासाठी सिलबंद करण्यात आलेले आहे. तसेच आरोपी नामे गोकुळ बाबुलाल कोठारी याचे विरुद्ध नांदगाव पोलीस ठाणे येथे भा. द. वि. कलम १८८,२७२,२७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ मधील विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढिल तपास पोलीस करीत आहेत.