नांदगाव – बंजारा समाजाचे दैवत भगवान श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी सौ. अंजुम कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातील विविध बंजारा तांड्यावर आयोजित सेवालाल जयंती उत्सव कार्यक्रमात सहभाग घेऊन बंजारा समाजाच्या महिलांसोबत फेर धरला.
तालुक्यातील वसंत नगर तांडा, ढेकू तांडा, मुळडोंगरी तांडा येथे याप्रसंगी सौ. कांदे यांनी बंजारा समाजाची पारंपारिक वेशभूषा धारण केले. त्यांचे बंजारा समाजातील माहिलांनी प्रत्येक तांड्यावर पारंपारिक गीते गावून स्वागत केले. भगवान श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. सौ. अंजुम कांदे यांनी या प्रसंगी महिलांसह बंजारा नृत्यात सहभाग घेतला. बंजारा समाजातील महिलांशी हितगूजही केले.
याप्रसंगी सौ. अंजुम कांदे यांच्या सोबत उज्वलाताई खाडे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख संगीता बागुल, भावराव बागुल, अण्णासाहेब मुंडे, एन. के. राठोड, अमोल नावंदर आणि बंजारा समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.