नांदगाव – येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने‘वनस्पती नामकरण’ (Plant Nomenclature) या विषयावर एक आंतरराष्ट्रीय वेबीनार १५ डिसेंबर २०२१ रोजी आँनलाईन संपन्न झाला. या वेबिनारसाठी जागतिक ख्यातीचे वनस्पती संशोधक तसेच अमेरिकेतील केम्ब्रिज येथील हार्वर्ड विद्यापीठातील वरिष्ठ नामकरण निबंधक डॉ. कांची एन. गांधी हे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले होते. हा वेबीनार गुगल मीट या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
या वेबिनारसाठी भारतातील जवळपास सर्वच राज्यांमधील तसेच भारताबाहेरील वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी अश्या १०० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती दर्शविली असे या वेबिनारचे संयोजक डॉ. भागवत चवरे यांनी सांगितले. डॉ. गांधी यांनी वनस्पती नामकरण कसे केले जाते या विषयी सांगितले तसेच टायपिफिकेशन, व्हेलिड पब्लिकेशन, रूल ओफ प्रायोरिटी, कोईनिंग ओफ जनरीक एंड फेमिली नेमस अशा विविध विषयांवर आधारित शास्त्रीय माहीती सर्व सहभागींना दिली.सहभागी शिक्षक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या वेबीनारचा फायदा त्यांचे या विषयातील ज्ञान अद्ययावत करणेसाठी झाला. वेबीनारचे संयोजक डॉ. चवरे यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून या वेबीनारच्या आयोजनाचा हेतू आणि महत्व विशद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी त्यांच्या भाषणातून देशभरातून आँनलाईन असलेल्या सर्व सहभागींना मराठा विद्या प्रसारक समाज संस्था तसेच महाविद्यालयाविषयी माहिती दिली.
शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आय.क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. विठ्ठल सोनवणे यांनी केले.या वेबिनारसाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक आ. दिलीपदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यायालयाचे प्राचार्य डॉ. संजय मराठे यांचे मार्गदर्शनाखाली आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. व्ही. बी. सोनवणे, वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. ए. एन. मदने, श्री. एस. एस. शिंदे तसेच महाविद्यालयातील इतर विभागातील प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. सागर वडाकते श्री. बाबासाहेब दळे श्री. सतिश अहीरे यांनी या वेबिनारच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केले.