नाशिक – गेल्या महिन्यात पालकमंत्री छगन भुजबळ व नांदगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा वाद चांगलाच पेटला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खा. संजय राऊत यांच्या नांदगाव दौ-याची चर्चा होती. हा दौरा आज झाल्यानंतर खा. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे थेट सुहास कांदेना भविष्यात मंत्री करण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. यावेळी राऊत यांनी नाशिकला तुमच्याकडे लाला दिवा आहे तो कधी सुहास कांदे यांच्या निमित्ताने नांदगावलाही येऊ द्यावा असे सांगून अप्रत्यक्षपणे आ. कांदेला मंत्री करण्याचे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी भेदाभेद करू नका असे सांगत टोलेबाजी केली. आता कुठल्याही परिस्थितीत नांदगाव मतदार संघातील शिवसेनेचा भगवा खाली उतरवू देणार नाही असेही सांगत आता भुजबळांनी नांदगावचा नाद सोडावा असे सूचक विधानही केले.
येथील गुप्ता लॉन्सवरील झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत चौफेर टोलेबाजी करत. शिवसेनेच्या असंतोषाला वाट मोकळी करुन दिली. त्यांनी भुजबळांवर थेट हल्ला करण्याचे टाळत मात्र कानपिचक्या दिल्या. शिवसेनेच्या पुढाकारातून महाआघाडीचे सरकार राज्यात आहे. हे सरकार नसते तर भुजबळही मंत्री म्हणून दिसले नसते असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या पुण्याईवर तुम्ही राजकारणात टिकून आहात आज महाआघाडीच्या सरकारात व आघाडीचे छगन भुजबळ नेते आहेत. त्यांचा सन्मान आम्ही सर्व करू मात्र सन्मान टिकविण्याची जबाबदारी देखील तुमची आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमदार कांदे यांचे कौतुकही केले. नांदगाव मतदार संघातील विकासासाठी आमदार कांदे यांची प्रामाणिक तळमळ आहे. भाऊसाहेब हिरे यांच्या नंतर विकासाची तळमळ राखणारा हा पहिला आमदार आमच्या शिवसेनेचा आहे असेही ते म्हणाले.