नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेडसर असलेला एक व्यक्ती पहाटेच्या सुमारास नाशिकच्या नांदगाव रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या कृषीनगर एक्स्प्रेस या प्रवाशी गाडीच्या डब्ब्यावर चढला..अन् इकडे तिकडे चालू लागला..या गाडीवरून त्याने स्थानकात उभी असलेली महानगरी एक्स्प्रेसवर ही उडी मारली..यावेळी ‘ ओव्हर हेड वायर ‘अगदी जवळच होती..त्याचा थोडाही स्पर्श या वायरला झाला असता तर त्याचा विद्युत करंट लागून अपघात झाला असता..मात्र रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख असलेले संदीप पाटील यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने त्या वेडसर व्यक्तीचा जीव वाचला..यावेळी रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वेच्या डब्ब्यावरून खाली खेचले..या सर्व प्रकारामुळे दोन्ही गाड्यांना मात्र अर्ध्या तासाच्या फरकाने स्थानकाबाहेर पडावे लागले ..या माथेफिरूला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे…