नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण व घाटमाथ्यावरील तब्बल ६ गावांनी एल्गार पुकारला आहे. अपूर्णावस्थेतील रस्त्यांच्या कामासाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे गेल्या ४ दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळेच बोलठाणसह परिसरातील ढेकू, रोहिले, जातेगाव, जवळके, लोंढरे, बोलठाण या सहा गावांनी आज गाव बंदचा इशारा दिला आहे. या बंदद्वारे प्रशासनाचा निषेध करण्याेच ग्रामस्थांनी निश्चित केले आहे. बंदमुळे सहाही गावात अत्यंत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, एकाचवेळी तब्बल ६ गावांनी बंद पाळल्याने प्रशासनातही खळबळ उडाली आहे.