अजय सोनवणे
नांदगाव – वैशाख महिन्याची सोमवती अमावस्या व शनी जयंती हा दुर्मिळ योग आल्याने नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे शनी मंदीरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. नस्तनपूर हे शनीच्या साडेतीन पिठापैकी एक पीठ म्हणून ओळखले जाते. शनी अमावस्या आणि शनी जयंतीला या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. नस्तनपूर येथील स्थापित शनीदेवाचे मंदीर अतिशय पुरातन आणि जागृत देवस्थान आहे. प्रभू श्रीरामाने त्याची स्थापना केलेली असल्याने या ठिकाणाला अतिशय महत्व असून शनी अमावस्या आणि शनी जयंतीला दूरवरून भाविक येथे दर्शनाला येत असतात.