अजय सोनवणे-मनमाड
नांदगाव – आमदार सुहास अण्णा कांदे आणि गुरुकुल पॉलिटेक्निक नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार तरूण विद्यार्थ्यांसाठी सातत्याने रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात येत असतो. या माध्यमातून आजपर्यंत शेकडो तरुणांना नाशिक इगतपुरी सिन्नर परिसरातील कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. शनिवार शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय मनमाड येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यास मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी मोठा प्रतिसाद देत आज मुलाखती दिल्या असता सर्वच २६५ विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
याप्रसंगी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंबड सातपूर गोंदे इगतपुरी वाडीवऱ्हे सिन्नर दिंडोरी येथील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. उत्तम पगार व इतर सुविधा या कंपन्यांमध्ये उपलब्ध असणार आहेत.मतदार संघातील प्रत्येक बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोकरी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येतो. तेव्हा या संधीचा लाभ प्रत्येकाने घ्यावा, मेळाव्यास उपस्थित न होऊ शकलेल्या तरुण-तरुणींनी शिवसेना संपर्क कार्यालय नांदगाव मनमाड व मालेगाव येथे संपर्क करावा आपणास नक्कीच नोकरी मिळवून दिल्या जाईल असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे.