अजय सोनवणे, नांदगाव
नांदगाव – शनिअमावस्याच्या निमित्ताने नाशिक जिल्हयातील नस्तनपुर येथील स्वयंभू पुर्ण पीठ म्हणून ओळखल्या जाणा-या श्री शनी देवाच्या दर्शनासाठी भाविकांची आज सकाळ पासूनच हजारोंच्या संख्येने मोठी गर्दी झाली होती. कोरोनामुळे दोन वर्ष मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना दर्शन घेता येत नव्हते. नस्तनपूर येथील शनीदेवाची वाळूकामय मुर्ती असून प्रत्यक्षात जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र नाशिकच्या दंडकारण्यात जात असतांना संध्यासमयी स्नान करतांना त्यांनी वाळूकामय मुर्ती तयार केल्याची अख्यायिका असल्याने या ठिकाणाला अतिविशेष महत्व असल्याच सांगण्यात येते. त्यामुळे आजच्या या दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली,भाविकांच्या सोयी साठी मंदीर प्रशासनाने उन्हाची तीव्रता लक्षात घेता मंदिर परिसरात सर्वत्र मंडप टाकून पाण्याची व्यवस्था केलीय.दोन वर्षा नंतर मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आल्याने विश्वस्तांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.