नांदगांव – वाढत्या उन्हामुळे दुचाकीने पेट घेतल्याची घटना नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. याबाबत निश्चित कारण समोर आले नसले तरी वाढलेल्या तापमानामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अचानक या दुचाकीने पेट घेतल्यानंतर स्फोट होईल या भीतीपोटी कुणीही आग विझवण्याचा प्रयत्न केला नाही. पण, आगीची तीव्रता कमी झाल्यानंतर ही आग विझवण्यात आली. या आगीत दुचाकीचे फायबर व शीट कव्हर पूर्णपणे जळाल्याने नुकसान झाले आहे. ही दुचाकी जळत असतांना बघ्यांची मात्र मोठी गर्दी होती.