नांदगाव – अस्वलदऱ्यात राहणाऱ्या दोघा गटातील बाचाबाचीचे पर्यावसन मारामारीत झाल्यामुळे दोन महिला जखमी झाल्या आहे. या बाचाबाचीत एकमेकांवर दगड भिरकाविण्यात आले. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार थेट पोलीस ठाण्याबाहेर घडला. पोलिसांना हाणामारीचा प्रकार कळताच त्यांनी सगळ्यांना पिटाळून लावले. पती सोबत रहाला तयार आहे पण मावस सासु ,दीर हे पती पत्नीला एकत्रीत राहू देत नाही यावरुन हा वाद होता. यातील काही महिलांचे भांडण सुरु होते. त्यातील एकदोघांनी एकमेकांवर दगड भिरकाविण्यास सुरुवात केली. या दगफेकीनंतर पोलिसांना बघून एकच धावपळ पुन्हा उडाली. जखमी महिलांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. फिर्यादी मिनी लखीम भोसले यांनी तक्रार दिली असून त्यात माझा पती मला नांदवायला तयार आहे. परंतु मावस सासू, दीर हे आम्हाला एकत्रीत राहु देत नाही असे म्हटले आहे.