नांदगाव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणच्या अनुसूचित जाती,व नवबौध्द घटकांच्या वस्ती व गावातील मूलभूत सुविधा करण्यासाठी विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती व गावांच्या विविध विकास कामांना ही मंजुरी मिळाली आहे. त्यात मौजे चिंचविहिर येथील मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,जळगाव खुर्द येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत आंबेडकर नगर येथील पेव्हर ब्लॉक बसवणे, जळगाव बुद्रुक मागासवर्गीय वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे, तांदूळवाडी मागासवर्गीय वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे,बोलठाण मागासवर्गीय वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,जातेगाव मागासवर्गीय वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,लोढरे मागासवर्गीय वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, ढेकू बुद्रुक मागासवर्गीय वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे,मांडवड मागासवर्गीय वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे, कासारी मागासवर्गीय वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे आदी कामांना मंजुरी मिळाली आहे लवकरच या कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.