नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेले माणिकपुंज धरण शंभर टक्के भरून सांडव्यावरुन पाणी मन्याड नदी वाहू लागले आहे. ३९५ दशलक्ष घनफुट क्षमता असलेले माणिकपुंज धरण भरल्याने नांदगावच्या पुर्व भागातील शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या धरणावर पूर्व भागातील १० ते १२ गावांसह चाळीसगाव तालुक्यातील ८ गावांमधील सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यंदा उशिरा का होईना धरण भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.