नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव बस आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. चाळीसगाव येथून नांदगाव येथे ही बस आली होती. बस मधून प्रवाशी उतरल्या नंतर ही घटना घडली. मात्र ही घटना घडताच स्थानकामध्ये एकच गोंधळ उडाला.
शॉर्ट सर्किट मुळे बसने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने बस मधून प्रवाशी खाली उतरले होते. तसेच, अन्य प्रवासी बसमध्ये चढले नाहीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्याचे दिसताच कर्मचाऱ्यांनी तात़डीने नांदगाव अग्निशाम दलाला माहिती दिली. दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग विझवण्यात आली. मात्र, स्थानकात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.