नांदगाव – सध्या पेट्रोलचे दर सर्वसामान्याच्या अवाक्या बाहेर गेलेय त्यामुळे ग्रामिण भागातील नागरीकांना त्याचा अधिक फटका सहन करावा लागत आहे.त्यातच उन्हाचा पारा वाढत असतांना शेतात जातांना रस्त्यावरचे खड्डे,पेट्रोल महागलेले त्यामुळे दुचाकी गाडी घेऊन जाणे सुध्दा जिकरीचे झालेले अशा वेळी घोड्याला टाच मारावी त्याप्रमाणे बैलावर स्वार होत एक तरुण शेतात जात असतांनाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. नाशिक जिल्हयाच्या नांदगाव तालूक्यातील सोयगाव या गावातील मुलाचा हा फोटो आहे.