नाशिक – शेतकरी, युवा, महिलांच्या विरोधातील केंद्र सरकार आहे. इंग्रजांपेक्षा वाईट परिस्थिती भाजपने देशाची केली. भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागेल असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक येथे केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकाही केली. देशावर संकट येते तेव्हा सगळ्यांना एकत्र करण्याचे काम होत होत असे, पण, हेरगिरी मुद्द्या बद्दल उत्तर द्यायला देशाचे प्रधानमंत्री समोर येत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये आलेले सरकार स्वातंत्र चळवळीत नव्हते. भाजपाचा एक माणूस तरी क्रांती मैदानावर अभिवादनासाठी कधी गेला का ? स्वातंत्र्याचं या लोकांना घेणे देणे नाही. गंगा नदीत हिंदूंचे मृतदेह वाहत असताना, मोदी शहा निवडणुकांच्या प्रचारात ‘दीदी ओ दीदी’ म्हणत होतें. जालियानवाला बाग पेक्षा जास्त लोक या लोकांनी (भाजपने) लोकशाहीत मारले असेही त्यांनी सांगितले.
नाना पटोले , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज नाशिक दौ-यावर होते. यावेळी हुतात्मा स्मारक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईत लोकल सुरु करण्याच्या मुद्यावर दानवे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. केंद्राने सगळे कोरोनाचे नियम लावले आहेत. रेल्वे सुरू करायची तर केंद्र म्हणतो आमची परवानगी नाही घेतली. एकीकडे म्हणायचे रेल्वे सुरू करत नाही आणि दुसरीकडे केंद्राने परवानगी द्यायची नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी रामाच्या नावाने टोल गोळा करण्याचे काम सुरु आहे. गावातील सप्ताहाचा हिशोब दिला नाही, तर गावातले लोक नेत्यांची बिन पाण्याने चंपी करतात, तशी यांची चंपी करण्याची वेळ आल्याचेही पटोले यांनी सांगितले.प्रधानमंत्री योजनेत जे पैसे लाटले त्याचा हिशोब आधी द्या असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी नोट बंदी झाल्यावर आतंकवाद संपेल अस म्हटले होते मग आतंकवादी राहुल गांधी आहेत तिथपर्यंत कसे येऊ शकले ? ज्या परिवाराने देशासाठी रक्त सांडले, त्या घरातील राहुलजींना संपवण्याचा कट तर नाही ? असा प्रश्नही केला. यावेळी त्यांनी गांधी नावातच एवढा दम आहे की त्यांना गांधी या नावाची भीती वाटते असेही सांगितले. बघा नाना पटोले यांचे संपूर्ण भाषण फेसबुक लिंकवर ….
https://www.facebook.com/NanaPatoleINC/videos/355972842792554/