मुंबई – काँग्रेस पक्षाच्या विस्ताराची जबाबदारी माझ्यावर आहे. २०१४ प्रमाणे पुन्हा धोका मिळू नये यासाठी काँग्रेसची स्वबळाची तयारी सुरु असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी त्यांनी २०२४ ला राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सरकार तयार होणार असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या नेत्यांची पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बुधवारी झालेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पटोले काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी पटोले म्हणाले की, शरद पवाराच्या घरी झालेल्या बैठकीचे मला आमंत्रण नव्हते. ओबीसी आरक्षण बाबत भूमिका ठरवण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी बैठक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी फडणवीसांनी बहुजन समाजाच्या नेत्यांचे नुकसान केले. खडसेचेही नुकसान केले. विरोधकांकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असेही ते म्हणाले. केंद्राने देश विकायला काढला अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.