अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सटाणा तालुक्यातील नामपूर शहरातील शिवसैनिकांनी सटाणा-नामपूर-साक्री मार्गावर शिवसेना पक्षप्रमुख , राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ फलक घेऊन शिवसेना झिंदाबाद. उध्दवसाहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है. ..अशा घोषणा देत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. नामपूर तालुका प्रमुख सुभाष नंदन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन नामपूर शहरात करण्यात आले. आपल्या पक्षप्रमुखांविषयी झालेल्या प्रकाराची तीव्र नाराजी व्यक्त करीत गद्दरांना क्षमा नाही. दुर्देवाने पक्षातीलच विघ्नसंतोषी आज गद्दार झाले आहेत. आजपर्यंत अनेकांनी शिवसेना संपविण्याची भाषा केली, प्रयत्न केले मात्र शेवटी तेच संपले. शेवटच्या श्वासापर्यंत येथील शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी राहून त्यांना साथ देतील, त्यांचा आदेश मानतील असे ही नंदन यांनी स्पष्ट केले.