शरद नेरकर
नामपूर – बागलाण तालुक्यातील नामपूर येथील बस स्थानकासमोरील कृष्णाई संकुल मधील जयेश गजानन खुटाडे यांच्या मालकीचे राशी मेडिकल व अमनसिंह राजपुरोहित यांच्या मालकीचे खेतेशवर बिकानेर या मिठाई दुकानाला पहाटेच्या वेळी शॉटसर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे धूर निघत असल्याचे डॉ. निनाद जोशी यांची कन्या श्रावणी निनाद जोशी ही अभ्यासाला उठली असल्याने तिच्या लक्षात आले. तिने डॉ. निनाद जोशी यांना खालून धूर निघत असल्याचे सांगितल्याने डॉ. निनाद जोशी यांनी वेळीच नागरिकांना संपर्क करीत बोलावून घेतले त्यांनतर सामाजिक कार्यकर्ते हिम्मत सावंत यांनी स्वमालकीचा पाण्याचा टँकर आणीत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनतर मालेगाव येथील अग्निशामक यंत्रणा व सटाणा नगरपरिषद येथील अग्निशामक यंत्रणा दाखल झाल्यानें सदर आग आटोक्यात आली आहे.
भल्या पहाटे आगीचे वृत्त गावात पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केलेत. घटना ज्या कृष्णाई संकुलात घडली तेथे २५ गाळ्यात दुकाने आहेत. हे सर्व नागरिकांच्या प्रसंगावधाणामुळे वाचले. सटाणा नगरपरिषद अग्निशामक यंत्रणा वेळीच हजर झाली असती तर तात्काळ आगीवर नियंत्रण मिळाले असते. परंतु सटाणा नामपूर रस्ता हा पूर्णपणे संपुष्टात आल्याने सदर अग्निशामक बंब येण्यास विलंब झाला असल्याने तात्काळ तो रस्ता दुरुस्ती करीत आंदोलन छेडणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ दिकपाल गिरासे व नागरिक यांनी इंडिया दर्पणशी बोलताना सांगितले. तसेच भविष्यात गावात अशी आग लागण्याची घटना घडल्यास नामपूर गावातील गल्ल्यांमधील गावात गल्ली की गल्लीत दिल्ली अशी अवस्था झाली असून त्यावर देखील उपाययोजना करण्याची मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत व सचिन कंकरेंज आदींनी केली आहे.
नुकसानभरपाई शासनाने द्यावी
शासनाने नामपूर गावातील ग्रामपंचायतीस निधी उपलब्ध करून ग्रामपंचायतीस एक अग्नीशामक बंब तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित पगार यांनी केली आहे. सदर आगीमुळे राशी मेडीकल नव्वद लाख खेतेश्वर मिठाई. ७५ लाख सनी माँलचे ए.सी पाच लाख जोशी हाँस्पिटल २० लाख बालाजी फर्टीलायझर एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच सदर आगीमुळे डॉ.जोशी यांच्या घराच्या खिडकीच्या काचा व त्यांच्या मालकीच्या इनोव्हा कार व स्कुटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सदर घटनेची तात्काळ दखल घेत घटनास्थळी जायखेडा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे व सहकारी व मंडळ अधिकारी सी. पी. अहिरे व तलाठी काष्टे यांनी सदर घटनास्थळाचा नुकसानीचा पंचनामा केला आहे. सदर नुकसानीची नुकसानभरपाई शासनाने द्यावी अशी मागणी सचिन अहिरराव, दिकपाल गिरासे, नारायण सावंत, विनोद सावंत यांनी केली आहे.
कायमस्लरुपी अग्निशममक दलाची गाडी हवी
कृष्णाई संकुलात आज पहाटे लागलेल्या भिषण आगिचे कारण अस्पष्ट असले तरी डाँ. जोशींची कन्या श्रावणीमुळे २५ दुकाने आगिपासून वाचलीत.तर गोकुळ ठाकरे यांनी जीव धोक्यात घालून दुकानातील सहा सिलेंडर तात्काळ बाहेर काढल्याने मोठा स्फोट टळला. आगिचे रौद्र रुपाचे जवळपास अनेक हाँटेल्स, फर्टिलायझर दुकाने , झेराँक्स दुकाने, मेडिकल दुकाने अशी दुकाने असल्याने आग पसरली असती तर आगिचे रौद्ररुप अधिकच भीषण झाले असते. यापूर्वी या संकुलात तीन आगीच्या घटना घडल्या आहे. २०१८ पासून आतापर्यत १८ आगीच्या घटना लागल्याचे प्रकार घडले आहेत म्हणून नामपूरला कायमस्लरुपी अग्निशममक दलाची गाडी उपलब्ध करुण देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.