इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही गावाचे, शहराचे, जिल्ह्याचे किंवा देशाचे नाव बदलणे ही काही नवीन गोष्ट राहिली नाही. सध्या तर भारतात अशा प्रकारे नामांतराची जणू काही लाटच आली आहे. परंतु परदेशात देखील असा प्रकार सुरू आहे. तुर्कस्तानने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ख्यात असलेले तुर्की हे आता यापुढे तुर्कीये म्हणून ओळखले जाणार आहे. नामांतराच्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रानेही मान्यता दिली आहे.
संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवतुल कावुसिग्लू यांनी संयुक्त महासचिव अँटोनियो गुटेरस यांना पत्र लिहीले होते. त्यात त्यांनी नमूद केले होते की, तुर्कीचे नाव बदलून तुर्किये ठेवण्यात यावे. तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री मेवतुल कावुसिग्लू यांची विनंती स्वीकारली आहे. त्यामुळे आता तुर्कीचे नाव तुर्कीये असे झाले आहे.
तुर्कस्तानच्या नामांतरामागे त्याचा इतिहास दडलेला आहे. वास्तविक तुर्की हे तिथल्या स्थानिक भाषेत नकारात्मक मानले जाते. 1923 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील नागरिक तुर्कीऐवजी तुर्कीये भाषा बोलत आहेत. बर्याच काळापासून अधिकृतपणे तुर्कीये करण्याचा प्रयत्न केला जात होता. याशिवाय, असेही बोलले जात आहे की तुर्की सरकारला आपल्या देशाचे नाव जगात ब्रँड म्हणून स्थापित करायचे आहे, म्हणून ते तुर्कीचे नाव बदलण्याचा आग्रह धरत होते, जे आता मान्य करण्यात आले आहे.
येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, तुर्की सरकारने आपल्या देशाचे नाव तुर्की असे लिहिणे आधीच्या सरकारनेच बंद केले होते. तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोआन यांनी आदेश दिला की, आतापासून तुर्की ऐवजी तुर्कीये असे लिहावे. यानंतर तुर्कीतून निर्यात होणाऱ्या मालावर मेड इन टर्की ऐवजी मेड इन टर्कीये असे लिहिण्यात आले. पर्यटन प्रमोशनमध्ये टर्कीऐवजी हॅलो टर्कीये असे लिहिले जात आहे.