नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत नामको हॉस्पिटल मध्ये विविध कॅन्सर फेलोशिप अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एम. बी. बी. एस., एम. डी., एम. एस. तसेच बी. एच. एम. एस. किंवा बी. ए. एम. एस. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा लाभ होतो आहे. नुकताच फेलोशिप इन मेडिकल ओंकॉलॉजि या अभ्यासक्रमाचा सन २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षाचा निकाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे जाहीर करण्यात आला. यात नामको हॉस्पिटल फेलोशिप सेंटरचे डॉ. निलेश पाठक व डॉ. रिटा सोनावणे हे विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.* हे दोन्ही विद्यार्थी होमिओपॅथी तज्ञ वैद्यकीय व्यायसायिक असून कॅन्सर, किडनी तसेच इतर अनेक गंभीर व्याधी व आजारांवर होमिओपॅथी द्वारे यशस्वी उपचार करीत आहेत. या मेडिकल ऑनकॉलॉजि फेलोशिप कोर्से नंतर होमिओपॅथिक कॅन्सर तज्ज्ञ म्हणून त्यांना एक वेगळी ओळख प्राप्त होणार आहे. *संस्थेचे अध्यक्ष श्री. सोहनलाल भंडारी यांनी या दोन्ही डॉक्टरांचे या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांनी समाजामध्ये नामको हॉस्पिटलची रुग्णसेवेची परंपरा कायम चालू ठेवावी अशा शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना नामको हॉस्पिटल मध्ये डॉ. संदीप ईशी, डॉ. मंगेश कोरडे, डॉ. श्रीकांत खरे, डॉ. राजेश वाळवेकर, डॉ. नागेश मदनूरकर डॉ. अभिजित सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. या त्यांच्या यशाबद्दल बोलताना संस्थेचे सचिव श्री. शशिकांत पारख यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या व समाजात कॅन्सर हॉस्पिटल व्यतिरक्त कॅन्सर रुग्णांचे उपचार करणे व त्यांना किमोथेरपी बरोबर इतर उपचारांचा वापर करून त्यांचे आरोग्य सांभाळणे व वेदना कमी करणे यासाठी या अभ्यासक्रमाचे नियोजन नामको हॉस्पिटलने केले असून या द्वारे समाजात कॅन्सर तज्ञ डॉक्टर रुग्णांना त्यांच्या घराच्या जवळपास उपलब्ध होणार आहेत असे सांगितले व या यश बद्दल त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व कॅन्सर तज्ञ डॉक्टरांचेहि त्यांनी अभिनंदन केले व आभार मानले.