नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मर्चंट को-ऑपरेटीव्ह बँकेची (नामको) वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी बॅंकेचे अध्यक्ष वसंत गिते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी सभासदाना दहा टक्के डिव्हीडंट देण्याची तरदुत केली असून तो पंधरा टक्के मिळावा यासाठी रिझर्व्ह बँकेला विनंती केल्याची गिते यांनी यावेळी सांगितले. यावेळी बॅंकेला ४४ कोटीचा नफा झाल्याची माहिती देण्यात आली.
सातपूर येथील बँकेचे प्रशासकीय कार्यालयात सकाळी ११ वाजता बँकेचे ही सभा संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष वसंत गिते, उपाध्यक्ष अशोक सोनजे, जनसंपर्क संचालक रजंन ठाकरे, संचालक सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक,विजय साने, सुभाष नहार.
प्रशांत दिवे, रजनी जातेगावकर, हरिष लोढा, संतोष धाडीवाल, शोभाताई छाजेड सह मुख्य कार्यकारी अधिकारी वित्राम दिक्षीत उपस्थित होते. यावेळी विषय पत्रिकावरील सर्व विषय मंजूर करण्यात आले
सभासद दिपक निरवाण यांनी इतर बॅका होम लोनला जामीन घेत नाही त्या धर्तीवर नामकोतही जामिन मागू नये अशी सुचना मांडली तर यावर बॅक आता होम लोनवर जामीन घेत नाही असे गिते यांनी सांगितले. तसेच जिल्हा बॅकेवर निर्बंध आल्यामुळे ग्रामीण भागातील शेतक-यांसाठी शाखा उखडण्याची ही मागणी यावेळी सभासदानी केली.