नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुट्टीच्या दिवशी कोणत्याही सहल किंवा जवळच्या पर्यटन स्थळी जाण्याचा मोह सर्वांनाच होतो, अलीकडच्या काळात तर सर्वच प्रकारचे लोक अशा प्रकारे सुट्टीचा आनंद लुटतात. परंतु नदी, तलाव, समुद्र, ओढे नाले दऱ्या, डोंगर या ठिकाणी सहलीवर जाताना काळजी घेणे गरजेचे ठरते. अन्यथा अपघात होऊन गंभीर दुर्घटना देखील घडू शकते. अलीकडच्या काळात अशा घटना सातत्याने समोर येत आहे. नागपूर शहरात देखील अशीच एक घटना कालच्या रविवारी घडली. रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या ५ जिवलग मित्रांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. मोहगाव झिल्पी तलावात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
…म्हणून घडली दुर्घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पराळे हा डॉ. प्राजक्त मोरेश्वर लेंडे (३२, रमना मारोती चौक) यांच्याकडे कारचालक म्हणून नोकरी करतो. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने ऋषिकेशने आपले मित्र शंतनू, राहुल मेश्रामला सोबत घेऊन तळ्याकाठी जाण्याचा बेत केला. त्यानुसार ठरल्याप्रमाणे ऋषिकेश शंतनू, राहुल आणि अन्य मित्रासह मोहगाव झिल्पी तलावावर पोहचला. इतकेच नव्हे तर त्याने डॉ. प्राजक्त लेंडे आणि त्यांचा मित्र वैभव वैद्य या दोघांनाही तेथे बोलावले. दरम्यान, तलावात असलेले पाणी पाहून ऋषिकेश, शंतनू, राहुल आणि त्याच्या मित्राला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. सर्वजण होत असताना पाण्याचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने यात पाच जण बुडाले.
परिसरातील नागरिक मदतीला
एकमेकांना वाचवत असताना या तरूणांना जलसमाधी मिळाली. यात ऋषिकेश पराळे (वय २१, वाठोडा ) राहुल मेश्राम (वय २३, गीडोबा मंदिर चौक, वाठोडा), वैभव वैद्य (वय २४, भांडेवाडी रोड, पारडी) शंतनू अरमरकर (वय २३) आणि नितीन कुंभारे ( वय २५ ) अशी मृत तरुणांची नावे आहेत. यात चौघांना पोहणे येत नव्हते, तरीही ते एकमेकांच्या सहाय्याने तलावाच्या पाण्यात उतरले. सुरुवातीला तलावाच्या काठावर त्यांनी आंघोळ केली. मात्र, ऋषिकेश खोल पाण्यात गेला. त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे गेले. चौघेही बुडायला लागले. त्यामुळे वैभव वैद्य हा त्यांना वाचवायला गेला. तोही बुडाला. हे सर्व तरुण डॉ. प्राजक्त यांच्या समोर बुडाले. त्यांनी दरम्यान, याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. तसेच उर्वरित तिघांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.