नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक, धुळे पाठोपाठ आता नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहे. विजय पचोरी असे वडिलांचे नाव आहे. तर पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी, असे इतर मृतकांची नावे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
या घटनेत चार मृतदेहापैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळले आहे. त्यामुळे वडिलांनी तिघांच्या हत्येनंतर स्वत. आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पण, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही. तपासानंतर यामागील कारण पुढे येईल.
या घटनेत वडील विजय पचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुलांच्या व्यवसायातील आर्थिक तंगीमुळे कुटुंबात आधीच वाद सुरु होता. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला गेला असावा आणि त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा आहे.