नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस प्रमाणेच नागपूर भाजपही नेत्यांचा पक्ष होतोय, पक्ष आहे म्हणून आपण आहोत, हे कायम लक्षात असू द्या. केंद्रात, राज्यात सत्ता आहे म्हणून अहंकाराने वागू नका. हा अहंकार जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नेत्यांनी कार्यकर्ते म्हणून काम करावे अन्यथा भाजपची स्थिती काँग्रेससारखी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर, आता नागपूर भाजप जोमाने आगामी निवडणूकीच्या तयारीला लागली आहे. यात महानगरपालिका निवडणुक, त्यानंतर येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचा समावेश आहे. याच पार्श्वभुमीवर नागपूर शहर भाजपच्या कार्यकारणीची बैठक पार पडली.
अहंकार सोडा, जनतेत जा
फडणवीस म्हणाले, देशात आणि राज्यात पक्षाची सत्ता आल्याने काही जणांमध्ये अहंकाराची भावना निर्माण झाल्याचे दिसून येते. ज्या दिवशी हा अहंकार जनतेला दिसेल त्या दिवशी ते आपल्याला झोपवल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेस पक्ष नेत्यांचा पक्ष झाला आणि त्यानंतर कागदावरचा पक्ष झाला. मला भीती आहे की नागपूरमध्ये भाजपची हीच अवस्था होते की काय? अहंकार बाजूला ठेवून कार्यकर्ते म्हणून जनतेची काम करा. जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागा. सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. पक्षात आलेल्या नवीन लोकांना सोबत घेऊन काम करा, असे फडणवीस म्हणाले.
१५० जागांचे लक्ष्य
बाळासाहेबांची शिवसेना सोबत असल्याने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला निश्चितच पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळतील. पण, राज्यात भाजपला स्वबळावर १५० जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला २०-२०च्या सामन्यासारखे काम करायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
Addressed and attended the BJP Nagpur Executive Meeting.@BJP4Nagpur President MLC Pravin Datke, MP, MLAs, MLCs, Corporators, office bearers, senior leaders and dear karyakartas were present.#BJP #nagpur pic.twitter.com/rxBsUtmoIs
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) February 17, 2023
Nagpur Devendra Fadnavis on Party Meeting