नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई पुण्याप्रमाणेच विदर्भात देखील काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते. नुकतील नागपूर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नागपुरात एका ३२ वर्षीय विवाहित महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला आहे. सीताबर्डी परिसरात परवा रात्रीच्या सुमारास भयानक ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. पिंटू गजभिये आणि कार्तिक चौधरी अशी या आरोपींची नावे आहेत.
फेसबुकवरून झाली ओळख
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ही मध्यप्रदेशातील असून आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. त्याचप्रमाणे तिला दोन मुले देखील आहे.
एकटी राहत असताना ती मोबाईलवर चॅटींग करत होती, तेव्हा सुमारे ३ वर्षांपूर्वी या पीडितेची ओळख फेसबुकवरून पिंटू गजभिये याच्याशी झाली होती. पिंटूने या महिलेला नोकरी लावून देण्याचा बहाण्याने भेटायला नागपुरात बोलावले होते. रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पीडित महिला बसने मध्यप्रदेशातून नागपूर स्थानकावर आली. तेव्हा तेथे फारसे कोणीही नव्हते , तेव्हा तिथून आरोपीने तिला कारमध्ये बसवून नागपूर ग्रामीण येथील सावनेरमध्ये नेले. यादरम्यान पिंटू गजभिये आणि त्याचा साथीदार कार्तिक चौधरी यांनी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर रात्रभर तिला गाडीत कोंडून ठेवल्या नंतर पुन्हा सीताबर्डी कॅम्पसमध्ये आणून सोडले.
प्रकृती बिघडली
बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेने तातडीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर महिला परराज्यातून एकटी आल्याने तिचा असाह्यतेचा फायदा घेऊन या नराधमांनी हे वाईट कृत्य केले, रात्रभर बलात्कार केल्याने त्यामुळे तिची प्रकृती बिघडली होती. ती खूपच घाबरली होती, दरम्यान, या घटनेनंतर काय करावे तिला सूचेना म्हणून तिने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांनी केली.