नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या ऑनलाईन गेमिंगची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक करण्यात येत आहे. अनेक जण या प्रकाराने अक्षरश: बर्बाद होत आहेत. अशाच एका प्रकरणात अनंत याने एका व्यापाऱ्याची तब्बल ५८ कोटी रुपयांनी फसवणूक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी अनंत जैन याची बँक खाती तपासली असता त्यातून ४ कोटींचे सोने, अडीच कोटी रोख जप्त करण्यात आले.
अनंत जैन याने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याची फसवणूक केली होती. या व्यापाऱ्याने नागपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी अनंत जैनविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन गेमिंग ॲप तयार करून हजारोंना फसवणारा बुकी अनंत जैन याच्या बँक लोकरमध्ये घबाड सापडलं आहे. ४ कोटींचं सोनं आणि अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपीचे नातेवाईकही फरार आहेत.’
लॉकरच्या झडतीसाठी अर्ज
अनंत जैनने इतर काही लोकांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवल्याची माहिती पोलीस तपासामधून पुढे येत आहे. गोंदियातील अनंत जैनच्या घराची पोलिसांनी झडती घेतली त्यावेळी १७ कोटींची रोख रक्कम, साडेबारा किलो सोनं आणि ३०० किलो चांदी असा एकूण सुमारे २७ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला होता. यावेळी पोलिसांना त्याचे गोंदियातील विविध बँकांमध्ये चार लॉकर असल्याचे आढळून आले. लॉकरची झडती घेण्याची परवानगी मिळावी यासाठी गुन्हेशाखा पोलिसांनी न्यायालयात अर्ज केले.
nagpur crime online gaming anant jain gold cash locker
police commissioner amitesh kumar