शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संतापजनक! १४ महिन्याच्या मुलीला रेल्वेत बसवून बापाने काढला पळ

नोव्हेंबर 11, 2022 | 2:42 pm
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर रेल्वे स्थानकात एक विचित्र प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका १४ महिन्याच्या चिमुरडीच्या वडिलांनी तिला भलत्याच ट्रेनमध्ये बसवून देत मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. विशेष म्हणजे आईचं लक्ष चुकवून या चिमुरडीच्या वडिलांनी हे कृत्य केले आहे. पण पित्याचा हा बनाव फार काळ टिकू शकलेला नाही.

आरोपी पित्याचं नाव कृष्णकुमार राजकुमार कोसले असं असून तो मूळचा रायपूर, छत्तीसगड येथील रहिवासी आहे. त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. पत्नीसह तो प्रवास करत होता. त्याची पत्नी गर्भवती आहे. कृष्णकुमार हा चेन्नईला कामाच्या शोधात गेला होता. पण पत्नीच्या प्रसुतीची वेळ जवळ येऊ लागल्याने तो पुन्हा गावी परतत होता. वाटेत तो रात्री नागपूर स्थानकात उतरला. ती रात्र त्याने नागपूर रेल्वे स्थानकात काढली. ७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

सकाळी सहा – साडे सहा वाजण्याच्या सुमारास पत्नीचे लक्ष नाही हे पाहून कृष्णकुमार कोसले याने डाव साधला. त्याने आपल्या अवघ्या १४ महिन्यांच्या जिज्ञासा या मुलीला उचललं आणि जबलपूर अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल कोसमध्ये जाऊन बसला. पण जशी गाडी रेल्वे स्थानकातून सुटली, तसा कुष्णकुमार मुलीला एकटीला तिथंच ठेवून गाडीतून खाली उतरला. जेव्हा पत्नीने कृष्णकुमारकडे विचारणा केली तेव्हा एकाने आपल्याला मारहाण करुन जिज्ञासाला पळवून नेल्याचे त्याने सांगितले. यानंतर दाम्पत्य गावी गेलं. तिथे कुटुंबीयांचा संशय बळावला आणि कृष्णकुमार पोलिस तक्रार करण्यासाठी दाम्पत्याने नागपूरचं शांतीनगर पोलीस ठाणं गाठलं.

अखेर आरोपी पित्याचा कट उघडकीस आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून बापानेच हे धक्कादायक कृत्य केल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाला आहे. पोलिसी खाक्या दाखवताच कृष्णकुमारने आपल्या कृत्याची कबुली दिली आहे. मात्र १४ महिन्याच्या मुलीचा अजूनही शोध लागू शकलेला नाही. सध्या या मुलीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. पोलिसांनी या मुलीचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून ही चिमुकली कुठे दिसली तर नागपूर पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nagpur Crime Father Fly Away 14 Year Girl Drop in Railway

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आधार कार्ड दर १० वर्षांनी अपडेट करावे लागणार का? सरकार म्हणते…

Next Post

केंद्र सरकारने राज्यांना दिला १,१६,६६५ कोटींचा कर; महाराष्ट्राच्या वाट्याला आले एवढे…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
indian rupees e1668161728931

केंद्र सरकारने राज्यांना दिला १,१६,६६५ कोटींचा कर; महाराष्ट्राच्या वाट्याला आले एवढे...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011