नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चिमुकली मुले घरात सारखे इकडे तिकडे पळत असतात. आणि कोणत्याही वस्तूला हात लावतात, त्यामुळे त्यांच्यावर सारखे लक्ष ठेवावे लागते. अन्यथा अनावस्था प्रसंगाला सामोरे जावे लागते. शहरात अशीच एक दुर्घटना घडली. टीव्हीवर कार्टून बघत असताना चिमुकल्याने अचानक सेटटॉप बॉक्स खाली ओढला. त्याचवेळी त्याला विजेचा धक्का जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. आणि या बालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं
लहान मुलांना सांभाळणे ही अत्यंत अवघड गोष्ट असते, त्यांच्यावर सारखे लक्ष ठेवावे लागते अन्यथा ते काहीही करू शकतात. तसेच त्यातून जिवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. शहरात अशीच एक वाईट घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास प्रियांशू (वर्ष) या लहानग्याचे वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्याची आई घरकामात व्यस्त होती. आपल्याला कामात अडथळा येऊ नये आणि प्रियांशूचे मनोरंजन व्हावे, यासाठी आईने हॉलमध्ये टीव्ही लावला. टीव्हीवर कार्टून कार्टून सुरू होते. मात्र, खेळता-खेळता प्रियांशू टीव्हीकडे गेला. त्याने टीव्हीवर ठेवलेला सेटटॉप बॉक्स खाली ओढला. त्याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे प्रियांशू बेशुद्ध होऊन खाली कोसळला. ही बाब आईच्या लक्षात आली. तातडीने काय करावे करावे तेच कळेना, ती घाबरून गेली. त्यातच मुलाचे वडील घरी नव्हते, तिने जोरदार आरडाओरडा केला तसेच पतीला फोन केला.
मुलाच्या आईचा टाहो
शेजारच्यांचा मदतीने प्रियांशूला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन प्रियांशूला मृत घोषित केले. मन सून्न करणारी ही घटना शहरातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या ४ वर्षीय चिमुकल्याचे मृत्यूच्या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आपण घरात असताना आणि आपल्या डोळ्यादेखत लाडक्या प्रियांशूचा जीव गेल्याने आईने जोरदार टाहो फोडला.
Nagpur Crime Child Death TV Set top Box Electric Shock
Hingna City