सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निवडणूक शपथपत्र प्रकरण… देवेंद्र फडणवीसांविषयी कोर्टाने दिला हा निकाल…

by India Darpan
सप्टेंबर 8, 2023 | 2:05 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
devendra fadanvis


नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन गुन्ह्यातून नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषमुक्त केले. २०१४ च्या निवडणुकीतील शपथपत्रावर हा निकाल आला आहे. निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याच्या प्रकरणाची सुनावणीत न्यायालयाने हा निकाल दिला आहे. फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरुपाच्या होते. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याने फडणवीसांना दोषमुक्त करण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाजात सहभागी झाले होते.

देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या नऊ वर्षांत मुख्यमंत्री-विरोधीपक्षनेता-उपमुख्यमंत्री असा प्रवास झाला. पण तरीही २०१४ च्या निवडणुकीतील एक प्रकरण त्यांचा या प्रकरणाने पिच्छा सोडला नाही. हे प्रकरण निवडणूक शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपविण्याच्या संदर्भातील होते. गेल्या नऊ वर्षांत यावर अनेकदा सुनावणी झाली. आज न्यायालयाने निकाल दिला.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडवली, असा दावा करणारी याचिका अ‍ॅड. सतीश उके यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी अगोदरच प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेत निर्णय राखून ठेवला. यावर त्यांनी आज निर्णय दिला. सुनावणीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे वकील सुबोध धर्माधिकारी यांनी सांगितले की ‘नजर चुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले होते. गुन्ह्यांविषयी माहिती न देण्याचा कोणताही वाईट उद्देश नव्हता. तसेच प्रत्येक निवडणूकीला फडणवीस यांना मिळणाऱ्या मतदानाची संख्या ही वाढतच आहे.’ देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. उदय डबले, अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली तर अ‍ॅड. सतीश उके यांनी कारागृहातून व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे बाजू मांडली होती.

State Deputy Chief Minister Devendra Fadnavis acquitted in election affidavit case
Nagpur Court Order Devendra Fadnavis Election Affidavit Politics BJP

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘पतीला तलाक दे’, असे म्हणत प्रियकराने केले हे धक्कादायक कृत्य…

Next Post

भाव गडगडल्याने शेतकरी संतप्त… टोमॅटोचा क्रेटच पेटवला… (व्हिडिओ)

Next Post
Capture 6

भाव गडगडल्याने शेतकरी संतप्त... टोमॅटोचा क्रेटच पेटवला... (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 35

वाहन धारकांनी या तारखेपर्यंत एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसवावी….

जून 9, 2025
mahavitarn

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना…तिसरा व अंतिम लकी ड्रॉ या तारखेला

जून 9, 2025
rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
Audi A4 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ही सिग्‍नेचर एडिशन’ लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी पावणे चार लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

जून 9, 2025
Raj Thackeray

मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले….

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011