नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयविकाराचा झटका येऊन देण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे कोणाला केव्हा मृत्यू येईल सांगता येत नाही. अगदी एखाद्या सभागृहात भाषण देताना, रस्त्याने पायी चालताना, घरी निवांत बसलेले असताना, किंवा वाहन चालवताना देखील हृदयविकाराची झटका येऊ शकतो, त्यातच काही व्यक्तींची प्राण ज्योत मालवते. परंतु वेळीच उपचार झाल्यास त्यातून जीव देखील वाचू शकतो. मात्र यासाठी वेळीच उपचार होणे गरजेचे असते. अलीकडच्या काळात अशा अनेक घटना घडल्या. नागपूर मध्ये विमान उड्डाण घेण्यापूर्वीच पायलटचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
इंडिगो ही भारत देशामधील विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगांव येथे असून ही कंपनी कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक आहे. या कंपनीमध्ये मार्फत देशात आणि देशांतर्गत सुमारे ३०० विमाने प्रवासी सेवा देतात. नागपूर येथून पुण्याच्या दिशेने इंडोको कंपनीचे विमान निघाले होते. इंडिगो एअरलाइन्सचे नागपूरवरुन प्रवाशांना घेऊन जाणारे विमान काही वेळातच टेकऑफ करणार होते. पण विमानाचे टेकऑफ करणाऱ्या पायलट कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम (४० वर्षे) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विमान टेकऑफ करण्यापूर्वीच ही घटना घडली. पायलट विमानात बोर्ड होण्यापूर्वीच बोर्डिंग गेटजवळ खाली कोसळले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
एअरपोर्टवर गोंधळाचे वातावरण
पायलट मनोज सुब्रम्हण्यम हे खाली कोसळल्यानंतर एअरपोर्टवरील स्टाफने त्यांना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र दरम्यानच्या काळात आपल्या सहकारी पायलटच्या निधनाचे वृत कळताच या घटनेमुळे नागपूर एअरपोर्टवर काही काळ गोंधळाचे वातावरण होते. सुब्रम्हण्यम यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर खरे कारण समोर येईल. दरम्यान, आता इंडिगो कंपनीने या घटनेनंतर निवेदन जारी केले असून याबाबत दुःख व्यक्त केले आहे.
Nagpur Airport Pilot Heart Attack Death
Indigo Take Off