नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. विमानावर वीज कोसळल्याने दोन इंजिनीअर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. त्यानुसार दोन इंजिनीअरपैकी एकाचे वय २८ तर दुसऱ्याचे ३३ वर्षे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. इंडिगोच्या विमानाने धावपट्टीवर लँडिंग केले. प्रवासी निघून गेल्यानंतर आंबटकर आणि ऋषी सिंग हे दोन इंजिनीअर इंडिगो विमानात काम करत होते. याचदरम्यान वीज कडाडली आणि विमानावर कोसळली. या दुर्घटनेत दोन्ही इंजिनीअर गंभीर जखमी झाले. डॉ. हेतेश्याम यांनी तातडीने घटनास्थळी या दोघांची तपासणी केली. त्यानंतर या दोघांना किंग्सवे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
Nagpur Airport Lightening Strike 2 Engineers Injured Aircraft