नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रामटेक भंडारा रोडवरील खंडाळा गावाजवळ भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातात वृद्धासह, दहा महिन्यांचे बाळ आणि आठ वर्षीय मुलाचा मृत्यू
रविवारी सायंकाळी हा अपघात झाला.
कारमधील सर्व जण भंडारा जिल्ह्यातील साकोली इथले असून देवदर्शनासाठी ते रामटेकला आले होते. परशराम भेंडारकर, हिमांशू भेंडारकर आणि भार्गवी बोंद्रे अशी मृतांची नावं आहेत. या कारमध्ये पाच लहान मुलांसह नऊ जण प्रवास करत होते. अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले होते.
या सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी वृद्धासह तिघांना मृत घोषित केले तर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान अपघातग्रस्त कारमधील सर्व जण भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.