नागपूर – नागपूर स्थानिक स्वराज्य विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान असतांना नागपूरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलल्यामुळे मतदारांचा गोंधळ वाढला आहे. काँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी खास भाजपमधून उमेदवार आयात करून डॅा. रविद्र भोयर यांना वाजत-गाजत आणले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्याची तयारी काँग्रेसनी केली होती. पण, एेनवेळी भोयर यांनी असमर्थता दर्शवल्यामुळे काँग्रेसला अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठींबा द्यावा लागला. त्यासाठी आता काँग्रेसने असे पत्रक काढले आहे….