शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला आहे. अनेक ठिकाणी पिकांसह माती खरडून गेली आहे. तर या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नगर – मनमाड महामार्गावर राहाता- शिर्डी येथे वाहतूक बंद करण्यात आली. या महामार्गावर प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राहाता तालुक्यातील वाहतूक बंद असलेले मार्ग
अतिवृष्टीमुळे पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
🔴 शिर्डी – पुणतांबा रस्ता
🔴 अस्तगाव – श्रीरामपूर रस्ता
🔴 तीसगाव – लोहगाव रस्ता
🔴 रामपूरवाडी – वाकडी रस्ता
🔴 रामपूरवाडी – एकरुखे रस्ता
🔴 एकरुखे – पिंपळवाडी रस्ता
🔴 साकुरी – नादुर्खी रस्ता
🔴 राहाता – एकरुखे रस्ता
🔴 हसनापूर – दुर्गापूर – दाढ रस्ता
🔴 चितळी – एकरुखे रस्ता
🔴 तीसगाव – भगवतीपूर रस्ता
🔴 वाकडी – पांढरी वस्ती रस्ता
🔴 रुई – शिंगवे रस्ता
🔴 रुई – शिर्डी रस्ता
🔴 अस्तगाव – चोळकेवाडी रस्ता
🔴 एकरुखे – अस्तगाव रस्ता
🔴 राहाता – रांजणगाव खुर्द रस्ता
🔴 अस्तगाव – पिंपरी निर्मळ रस्ता
🔴 पिंपरी निर्मळ – आडगाव रस्ता
🔴 पिंपरी निर्मळ – गोगलगाव रस्ता
🔴 पिंपरी निर्मळ – राजुरी रस्ता
🔴 रांजणखोल – चारी क्र.७ रस्ता
🔴 आडगाव – लोणी रस्ता (बैल बाजारजवळ)
🔴 तीसगाववाडी – कडसकरवस्ती रस्ता
🔴 नांदूर बु – यादवमळा रस्ता