नांदगाव – काँग्रेस राजकीय पक्ष असला तरी प्रत्यक्षात तो राष्ट्रीय विचार असून सध्या देशाच्या पातळीवर आम जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणाने काँग्रेसचं शकते त्यामुळे प्रदेश कार्यकारी समितीवर आपली झालेली निवड सार्थ ठरवू असे प्रतिपादन माजी आमदार अँड अनिल आहेर यांनी केले अँड आहेर यांची काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारी समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल आहेरमित्र मंडळ व देवस्थानच्या विश्वस्थ मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र नस्तनपूर च्या शनिमंदिराच्या आवारात करण्यात आलेल्या नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देतांना ते बोलत होते ग्रामपंचायत सरपंच पदा पासून विधिमंडळापर्यंत सत्ताकारणाच्या विविध टप्प्यात काँग्रेसने आपल्याला खूप काही दिले असल्याबद्दल त्यांनी पक्षाबद्दल कृज्ञता व्यक्त केली अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार संजीव निकम होते अँड आहेर त्यांच्या धर्मपत्नी माजी सभापती सुनीताताई आहेर यांचा खासेराव सुर्वे,डॉक्टर शरद आहेर विजय चोपडा उदय पवार शिवराम कांदळकर कैलास गायकवाड आदींनी शॉश्रीफ़ळ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी डॉक्टर विष्णू आहेर,गणेश आहेर,जगन पाटील हरेश्वर सुर्वे,विलासराव साळुंके अयुब शेख,संदीप मवाळ,भाऊसाहेब सूर्यवंशी शिवाजी बच्छाव पुंडलिक सदगीर,योगेश वाघ रावसाहेब शेलार डॉक्टर शिरोळे प्रा. वैशाली सरोदे,सोनाली सरोदे,महेश आहेर भास्कर साळुंके सुनील पवार आदी उपस्थितीत होते शनिमंदिर क्षेत्राविषयी प्रा वैशाली सरोदे व सोनाली सरोदे यांच्या युट्युब वरील डाक्युमेंटरी चे प्रकाशन माजी आमदार अँड अनिल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी तर विजय चोपडा यांनी केले