नाभिक बांधवांच्या न्याय हक्कासाठी कटीबद्ध : नारायण यादव
पिंपळगाव बसवंत: नाभिक बांधवांच्या मागण्या आजही शासन दरबारी प्रलंबितच आहे. कुणीही उठतो संघटना काढतो, यात काही तथ्य नाही. समाजाची प्रगती साधायची असेल तर नाभिक बांधवांनी विखुरले न जाता नाभिक महामंडळाच्या माध्यमातून संघटित होणे काळाची गरज आहे. शासन दरबारी पाठपुरावा करून नाभिक बांधवांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही नाभिक महामंडळाचे जेष्ठ नेते नारायण यादव यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाची पिंपळगाव बसवंत शहरात आयोजित बैठकी प्रसंगी यादव अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्य नाभिक महामंडळ संघटक नितीन वाघ, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरुण सैदाने, जिल्हाध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय गायकवाड, सुरेश वाघ, जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, तालुका युवासेना अध्यक्ष प्रकाश वाघ, तालुका अध्यक्ष अरुण कडवे, दत्तात्रय वाघ, गोविंद वाघ, विलास सूर्यवंशी, उषा मोटेगावकर, तुषार जगताप आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या मार्गदर्शनाखाली नुतून जिल्हा, तालुका, शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात नाभिक महामंडळाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी श्रीकांत वाघ, यांची संघटकपदी बाळासाहेब बिडवई, जिल्हायुवा प्रसिध्दीप्रमुखपदी शुभम वाघ, तालुका उपाध्यक्षपदी वसंत सोनवणे, तालुका संघटकपदी सुनील गरुड, तालुकायुवा संपर्कप्रमुखपदी हरीश बिडवई, चिटणीसपदी गणेश बिडवे, तालुका युवासंघटक पदी सागर कदम,कृष्णा महाले, सहसंघटकपदी योगेश सैंदाणे, शहरअध्यक्षपदी संतोष सोनवणे, उपाध्यक्षपदी हरीश हिरे, खजिनदारपदी राहुल सोनवणे, आदींची निवड करण्यात येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले. यावेळी पिंपळगाव शहर सलून असोसिएशनचे पदाधिकारी, नाभिक बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..